हे 'व' की ते 'व'
हे 'व' की ते 'व'
जन्माला आल्यावर केवळ पाळण्यातील नावापलीकडे आपली काहीच ओळख नसते. आईवडील हेच काय ते विश्व. आपण आईचे बोट धरून चालतो... ती जिथेपर्यंत चालीचाली म्हणत नेते आणि ज्या वळणावरून मागे फिरवते तेवढेच आपले क्षितीज असते. ती सांगेल ते शब्द आपण बोलतो. आपण आकार घेत असतो आणि त्या जगात आपल्याभोवती आईचे वलय असते. आपण मोठे होतो...करिअर नावाच्या जगात पाऊल ठेवतो. त्या जगात अशी काही माणसं आपल्या भवताली येतात जी आपल्यावर वर्चस्व गाजवायला बघतात. आपल्याला निस्वार्थपणे दिशा देणाऱ्या माणसांचं वलय आपल्याला हवंहवसं वाटतं पण आपल्याला दिशा देण्याचा आव आणून वर्चस्व गाजवणाऱ्या माणसाचं वागणं घुसमट करतं. वलयमधलं 'व' आणि वर्चस्वमधलं 'व'...अक्षर एकच असलं तरी ज्या दोन प्रवृत्ती दाखवणाऱ्या शब्दांचे ते पहिले आद्याक्षर म्हणून येते तेव्हा मात्र त्याचा अर्थच बदलून जातो. वलय असलेल्या व्यक्तीबाबत आदर असतो कारण ती व्यक्ती तिच्या असण्याने आपल्याला प्रेरणा देत असते. तिच्यासारखच न वागता स्वत्व जपण्याचं बळ देते. वर्चस्व करणारी व्यक्ती ओझं बनते..किंबहुना अहंकारी मीपणाचा दबाव टाकते. त्यामुळे आपणच ठरवायचं की आपल्या आयुष्यात कोणतं 'व' असावं... हे 'व' की ते 'व'...
@अनुराधा कदम, कोल्हापूर

Comments
खूप छान