एक पाऊल....बदलाचे....
मनातलं...ओठावर
एक मुलगी आणि एक मुलगा...मग ते वर्गमित्र असतील, सहकारी असतील, एकाच गल्ली, कॉलनीत राहणारे शेजारी असतील, नात्यातील दूरचे भावंड असतील किंवा कोणतंही नाव नसलेले ओळखीचे असतील. त्यांना कुठे भटकायला जावंसं वाटलं...कुठेही, अगदी शहराबाहेरही. त्यांच्यात एक संवाद हमखास होतो. जेव्हा त्यांचं असं बाहेर जाणं ठरतं तेव्हा त्याच्याकडून तिला एक प्रश्न विचारला जातो की, माझ्यासोबत फिरायला येण्यासाठी तुला काही प्रॉब्लेम नाही ना?...त्यावर तिचं चाकोरीतलं उत्तर असतं ‘नाही रे...माझा तुझ्यावर तेवढा विश्वास आहे. तुझ्यावर विश्वास आहे म्हणजे मग कुणावर तरी विश्वास नाही असा अर्थ असतो का तिच्या म्हणण्याचा? त्यालाही हायसं वाटतं तिच्या बोलण्यातील विश्वास हा शब्द ऐकून. पण विषय इथं संपला असे मला वाटत नाही. तुला माझ्यासोबत यायला काही प्रॉब्लेम नाही ना ? असं त्याला विचारावच का लागावं? आणि माझा तुझ्यावर तेवढा विश्वास आहे असं तिला सांगावच का लागावं? जसे दोन मित्र किंवा दोन मैत्रीणी मनात आलं की फिरायला जातात तसे हे दोघं जेव्हा कोणत्याही प्रश्नोत्तराची सांगोपांग न करता एकत्र जाऊ शकतील...अगदी सहजपणे...तेव्हाच चित्र बदलेल. त्याने तिला छेडणं आणि त्यातून तिची घुसमट होणं, मग अत्याचार आणि आयुष्य संपवणं हे काही उरणारच नाही. त्या दोघांमध्ये विश्वास नावाचा शब्द चुकीच्या फूटपट्टीने मोजण्याची वेळ न येईल तरच बरे.______
अनुराधा कदम, कोल्हापूर

Comments