निमित्त....जागतिक चहा दिनाचे
@अनुराधा कदम
☕☕☕☕☕☕
रोज भेटणारे मित्र, सहकारी असोत किंवा बऱ्यास दिवसांनी गाठभेट होणारे दोस्त असोत...‘चल की भावा, चहा घेऊ’ असे म्हणत चहाच्या घोटासोबत गप्पांना गोडवा येत नाही. कोल्हापुरातील अशाच चहाप्रेमींमुळे अनेक चहाच्या टपऱ्या, छोटेखानी हॉटेल्स गेल्या कित्येक वर्षापासून चहास्पॉट बनले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून दिवसभर उकळणाऱ्या चहासोबत शहरात घडणाऱ्या घडामोडींचा चवीने समाचार घेण्यातली मजा फक्त चहाप्रेमी कोल्हापूरकरांनाच माहीत.
चहाची ऑर्डर देण्याचीही कोल्हापूरकरांची खास शैली. एका हाताची तर्जनी आणि मधले बोट वर करून त्यानंतर पंजा आडवा हलवून अर्धा अशी खूण केली की चहावाला समजून जातो की दोन कटिंग हवेत. क्वचितच ऑर्डर तोंडी दिली जाते. खरंतर खाण्यासाठी काहीही असा पिंड असलेल्या कोल्हापूरकरांना चहाची तलफ यायला भली सकाळ किंवा उन्हं खाली जाणारी संध्याकाळच हवी असं काहीच नाही. कोल्हापूरकरांच्या याच चहाप्रेमामुळे शहरात गेल्या कित्येक वर्षापासूनच्या चहाच्या खास जागा आणि त्यांच्या चवी आजही टिकून आहेत.
मंगळवार पेठेतल्या आहार हॉटेलमध्ये मिळणारा ’बंबातला चहा’ ही कोल्हापूरची चहाच्या पंक्तीतली हटके ओळख. आज ६५ वर्षे झाली,आहार हॉटेलमध्ये रोज बंबातल्या चहाला खळखळून उकळी फुटतेच. केवळ वाफेवर बंबाबत चहापूड शिजत असल्याने या चहाची चवच वेगळी. पापाची तिकटी येथील सूर्यकांत हॉटेलमध्येही बंबातला चहा मिळतो. या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे या चहात साखरेऐवजी गूळ घातल्याने येणारी चव एक नंबरच. ताराबाई पार्कातल्या आरटीओ कार्यालयाजवळ सेंद्रीय गुळाचा गावरान चहा मिळतो. या चहाचे वेड लागलेल्या अनेकांची पावले सकाळ संध्याकाळ तिकडे वळतातच.
कोल्हापुरातल्या चहाच्या हमखास जागांविषयी सांगताना महाद्वार रोडलगत असलेल्या वांगी बोळातल्या सत्यवानच्या चहाला वगळून चालणारच नाही इतका हा चहा गेल्या ५० वर्षात अनेकांनी रिचवला आहे. सत्याचा चहा वांगीबोळात उकळतो पण त्याचा सुगंध व्यासबोळ, आराध्येबोळ , सासनेगल्लीपर्यंत जातो हीच याची खासियत. हीच गोष्ट मंगळवार पेठेतल्या गुलाब गल्लीच्या कॉर्नरला असलेल्या साईराज चहाची. एका छोट्या कोपऱ्यावर असलेल्या या चहागाडीवर आयटीपार्कातील सॉफ्टवेअर इंजिनिअर वाट वाकडी करून एक कप चहा पिण्यासाठी येतात यातच साईराज चहाच्या चवीची महती आलीच. लक्ष्मीपुरीतल्या मिलन भजी चौकात भजीच्या सुवासासोबत परशुरामचा चहा घेणाऱ्या चहावेड्यांची संख्याही काही कमी नाही. गेल्या कित्येक वर्षापासून परशुराम चहाने आपली चव आणि दर्जा टिकवून ठेवला आहे. लक्ष्मीपुरी ते दसरा चौक मार्गावरील मेघदूत हॉटेलजवळ असलेल्या आंद्रे चहाचे चाहत्यांचाही येथे येण्याचा रोजचा शिरस्ता. राजारामपुरीतील मंडईजवळ चंद्रकांतचा चहा कुठे आहे असे विचारले तर कुणीही सांगेल इतक्या या चहाची चव प्रसिद्ध. गुजरी कॉर्नरला असलेल्या केरबाच्या चहाशिवाय महाद्वार रोडवरील जुन्या व्यापाऱ्यांचा दिवस एकतर सुरू होत नाही किंवा संपत नाही.
...
@अनुराधा कदम
☕☕☕☕☕☕
चल की भावा....चहा घेऊ...

Comments