बिटवीन द लाइन्स..
बिटवीन द लाइन्स..
अनुराधा कदम
शांता शेळके यांनी लिहून ठेवले आहे.... कधी अर्थाविण सुभग तराणा....कधी मंत्रांचा भास दिवाणा.... कधी अर्थाशिवाय एखादा तराणा मोहक वाटतो तर कधी शब्दांचे मनोरे केवळ भास वाटतात. असं म्हणतात की दोन ओळींच्या, दोन शब्दांच्या मधल्या रिकाम्या जागेतील अर्थ खूप काही सांगत असतो. दिसायला त्यात अंतर असते पण तिथेच जोडून ठेवणारही काहीतरी असतं. बिटवीन द लाईन्स अर्थात अंतराची भाषा समजून घेत असताना आपणही प्रगल्भ होत असतो. सध्या अंतर हा शब्द करोनाने धास्तावलेल्या जगात एक सामाजिक परवलीचा शब्द बनला आहे. दोन ओळीतील... दोन शब्दांमधील... किंवा दोन माणसांमधील अंतर असो आपण त्याकडे कसे आणि किती प्रगल्भतेने पाहतो यावर त्यातील बंध अवलंबून आहेत.
लॉक डाउनमध्ये सतत हाताशी असलेल्या मोबाईल मधील कुठल्याशा सोशल मीडियाच्या भिंतीवर बोट फिरवत असताना एक विनोदी प्रसंग समोर आला. विनोदातील पात्र अर्थातच नवरा आणि बायको अशी होती. दिवसातले आठ ते दहा तास घराबाहेर असलेला नवरा घरी आल्यानंतर होणाऱ्या गप्पा, सोबत वाफाळता चहा यात वेगळीच मजा असते. शाळेला गेलेली मुलं संध्याकाळी घरी येतात तेव्हा त्यांचा किलबिलाट म्हणजे पर्वणी असते. उदासवाण्या संध्याकाळी एक वेगळा तजेला देत असतं. असे म्हणतात की दूर गेल्याशिवाय जवळ असण्याची ओढ लागत नाही. थोडक्यात काय तर... सहवासातील, भेटीतील अंतर खरं तर आपल्याला जोडत असतं. आता लॉकडाऊन मुळे किमान एक महिना झाला सहकुटुंब घरात आहे. या निमित्ताने अनेक गोष्टी अधोरेखित होत आहेत. नात्यांमधली दरी सांधत आहे. कुटुंबातला संवाद वाढला आहे. एरवी आईच्या भोवती घुटमळणारी मुलं बाबांसोबत खेळत आहेत. बाबांच्या हातचा पदार्थ खाण्याची संधी मिळत आहे . खूप सारे चित्र बदलले आहे . सतत घरात असल्यामुळे एकमेकांच्या मनाचे न दिसणारे कंगोरे, कप्पे यानिमित्ताने दिसले. आणि कुठेतरी सामाजिक अंतर राखण्यासाठी कुटुंबाच्या परिघात आलेल्या अनेकांच्या नात्यातील अंतर खूप कमी झालं. अनेक मुलांच्या मनातील बाबांविषयीची अढी एक अंतर बनून राहिली होती. आताशा या अंतरातले अंतरही कमी झाले. करोनाने एक नवीन सूत्र या समाजाला दिले आणि ते आहे सामाजिक अंतर राखण्याचं. सध्याची ही गरज असली तरी या सामाजिक अंतरातील बिटवीन द लाईन्स समजून घेण्याची ही पण संधी आहे. एकीकडे कौटुंबिक बंध अधिक घट्ट होत असताना आपण समाजापासून थोडेसे लांब आलो आहोत.
दिवसभरातील आठेक तासांचे अंतर आणि त्यानंतर भेटीची ओढ हे प्रत्येकानेच अनुभवले अगदी महिन्याभरात पूर्वी पर्यंत आपले हेच रुटीन होतं . पण एका विषाणूंच्या संसर्गाने आपल्या आयुष्याचा पट एकदम 380 कोनात बदलून गेला. सतत एकमेकांच्या सान्निध्यात राहणे सहवासात राहणे याऐवजी एकमेकांपासून दूर राहणं ही सामाजिक सुरक्षिततेची चौकट बनावी अशी वेळ आता सध्या आपल्या आयुष्यात आली आहे. अकल्पनीय आहे पण एक वेगळ वास्तव स्वीकारायला लावणारीही आहे. आपली संस्कृती नेहमी सांगते की ,नाती जोडा. टिकवण्यासाठी एकमेकांना भेटा. रस्त्यात ओळखीची व्यक्ती दिसली तर हातात हात द्या. मात्र आता काही दिवस तरी आपल्याला हे अंतर राखत असताना या अंतर आलेल्या काळामध्येही असलेल्या नात्याच्या...आपुलकीच्या प्रवाहाचे किनारे दुरावणार नाहीत याचीही काळजी घ्या.

Comments