ती आणि तिचं स्वातंत्र्य
मनातले....ओठावर..
@अनुराधा कदम...कोल्हापूर
आजच्या महिला खूपच स्वावलंबी झाल्या आहेत ...त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आहे.. निर्णय स्वातंत्र्य आहे ...पण
बिटवीन द लाइन्स खूप काही आहे बोलण्यासारखं...
ते आत्ता लिहिणार आहे.
आजच्या महिला बाइक चालवतात... बाइक त्यांना स्वावलंबनाचे आणि आत्मविश्वासाचे बळ देते. याच वनलाइनवर माझा एका महिलेशी संवाद घडून आला. आणि सरतेशेवटी 'आज महिला स्वावलंबी आहे ' या विधानापासून 'तिला तिचं म्हणणं मांडण्याचे स्वातंत्र्य तरी आहे का'? या प्रश्नापर्यंत माझं विचारचक्र येऊन थांबलं....
ताई, तुम्ही किती वर्षापासून बाइक चालवता? माझा पहिला प्रश्न.
पंधरा वर्षापासून बाइक चालवते माझी बायको...उत्तर मात्र नवऱ्याने दिले.
बाइकमुळे तुमचं दैनंदिन आयुष्य किती सोप्पं झालय असं वाटतं?
अहो, किती वेळ वाचतो तिचा...शिवाय मुलांना ने आण, बाजारहाट, बिलं भरणं हे तिचं तीच करते...यावेळीही उत्तरासाठी नवरोबाचा आवाज..
पुढचे प्रश्न तिला आणि उत्तर मात्र त्याच्याकडून...
बाइक निमित्ताने असलेल्या स्पर्धांमध्ये तिने खूप बक्षीसं मिळवलीयेत...पोह्यांवर कोथिंबिर भुरभुरावी तसं नवऱ्याचं हे अॅडिशन मला खटकलं ते त्याच्या मी मी पणामुळेच.
आता मात्र माझा संयम सुटला...
दादा...जरा त्यांना बोलू द्या की...किमान त्यांना विचारलेल्या प्रश्नासाठी तरी त्यांनी बोलतं व्हावं. बाइकमुळे आयुष्याला आलेला वेग ताईंचा स्वत:चा असेल तर त्याविषयी बोलण्याचा लगाम तुमच्या हातात कशाला हवाय...?
थांबा की थोडं......नको...थांबू नका..त्यापेक्षा जरा तिकडे लांब जाऊन थांबा ताईंपासून...
करू देत त्या विचार...त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या मनातून आलेली असू दे...
हुश्श...नवरोबा झाले एकदासे शांत...उसनच हसले...तिच्याही चेहऱ्यावर सुटकेचा भाव आला... मग तीही उत्स्फूर्तपणे बोलली...तिच्या मनातलं.
छोटीशी मुलाखत संपली...
नवरोबांना राहवेना... आता महिलाराज आहे बुवा...काही बोलायचं नाही असं म्हणत नवरोबांनी मनातली खदखद व्यक्त केलीच.
मी म्हटलं....आता बोलून झाल्यावर, काही बोलायचं नाही म्हणून काय उपयोग... तिच्यासोबत आलात हे ठिक आहे...पण तिच्या मध्येमध्ये येऊ नका तरच ती पुढे जाईल...
माझा आपला रोखठोक सल्ला... हवं तर दम...तंबी...काहीही म्हणा...
मला माहित नाही याचा काय फरक पडेल त्या नवरोबासाठी...
@अनुराधा कदम...कोल्हापूर
ती आणि तिचं स्वातंत्र्य
______आजच्या महिला खूपच स्वावलंबी झाल्या आहेत ...त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आहे.. निर्णय स्वातंत्र्य आहे ...पण

Comments