Posts

कशासाठी शिकायचं....?

कशासाठी शिकायचं… आयुष्य संपवण्यासाठी की घडवण्यासाठी? अनुराधा कदम, कोल्हापूर कर्नाटकातून महाराष्ट्रात आजोळी शिक्षणासाठी राहणारी मुलगी. मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आईला घर चालवण्यासाठी उंबरठा ओलांडण्याशिवाय पर्याय नव्हता. पदरी एक शाळकरी वयातील मुलगी. दिवसभर कामासाठी बाहेर राहताना त्या आईचे लक्ष मुलीच्या सुरक्षेकडेच. मग गडहिंग्लजमधील माहेरी मुलीला शिक्षणासाठी ठेवायचे तिने ठरवले. शाळकरी वयातून पोर कॉलेजात आली. काही दिवसात ती पदवी घेईल. जमली तर दोनचार   वर्षे नोकरी करेल मग लग्न करून देऊ अशा विचाराने पोरीची आई सुखावली होती. मायलेकींचं एकमेकीवर अगदी जीवापाड प्रेम. मुलीनेही वडिलांच्या जाण्यानंतर आईची धडपड पाहिली होती. आईच्या कष्टाची तिला जाणही होती. म्हाताऱ्या आजीआजोबांसाठी तर ती दुधावरची साय. रोज रात्री आईसोबत खुशालीचा फोन शिरस्ताच झाला होता. सगळं कसं अगदी आखीव रेखीव सुरू होतं. मार्च मध्ये करोनामुळे कॉलेज बंद झालं. मग प्रवासावर बंधने आली. इथे तर मुलगी महाराष्ट्रात आणि आई कर्नाटकात असल्याने भेटण्याचा मार्गही बंद झाला. पण तिथे आई आणि इकडे मुलगी सुखरूप, सुरक्षित होते. काळजीच...

अपेक्षा

Image
अपेक्षा…आणि  आयुष्य  हे असं व्हायला हवं... ते तसं झालं तर… असं काही होईल अशी अपेक्षाच नव्हती… वाटलं नव्हतं आयुष्य अशाप्रकारे फिरकी घेईल… कधी मनात येतात ही अशी वाक्ये… आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या , किंवा घडाव्या असे वाटणाऱ्या गोष्टी नाही घडल्या की हे शब्द सहजपणे ओठावर येतात. शब्दांना गुंफणाऱ्या लेखकांनी असं म्हटलय की अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभ्ंगाचे दु:ख होत नाही. पण माणसाला जशा भावना असतात तशा कल्पनाही असतात. आपण अनेकदा आपल्या आयुष्याचे एक कल्पक चित्र रेखाटत असतोच की… तारूण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकणारी तरूणी तिच्या आयुष्याच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षांचे टिंब जोडत तिच्या डोळ्यातला त्याचा चेहरा तयार करत असते. शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायाच्या संधींच्या विश्वात येऊ पाहणारे तरूण त्यांच्या यशस्वी आयुष्याचा आलेख मांडत असतात. मुलाबाळांनी मार्गी लागावं हीच तर अपेक्षा असते ना आईवडीलांची. मुलीला तिच्या कलागुणांना वाव देणारं चांगलं सासर मिळावं, घरात येणारी सून दुधात साखर विरघळावी तशी एकरूप व्हावी अशाच अपेक्षांचा सूर्योदय होत असतो आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात. अप...

क्यू की बोलना जरुरी है बॉस...

क्यू की बोलना जरुरी है बॉस... ओ मॅडम, इथे गाडी लावू नका... का नको लावू...? पार्किंग पट्ट्याच्या आत आहे ना माझी गाडी? माझा प्रतिप्रश्न दिसत नाहीय का....मी बांगड्यांचा स्टॉल लावलाय... कष्टमरला त्रास होतो स्टॉलपर्यंत यायला... बर मग...?माझा आपला नवा प्रश्न... आणि तुझं दुकान तर ते समोर आहे...मग हा कॉट का मांडलायस रस्त्यावर? मी खोलात शिरले. आणि एक...रस्त्यावर, पार्किंगच्या जागेत गाडी लावायची नाही हे तू कोण सांगणार मला...माझा पारा चढला... तरी गाडी काढा इथून... आता कष्टमरचा टाइम आहे... गर्दी होईल स्टॉलवर....धंद्याचा वांदा करू नका नाहीतर तुम्ही येईपर्यंत गाडीतली हवा सोडेन.... त्याचा पीळ काही जात नव्हता....मी त्याच्याकडे बघतच गाडी लावली.... मुलाच्या पायाच्या घोट्याला जखम झाल्याने त्याला काही दिवस सँडल, बूट घालणं शक्य नव्हतं. चप्पलचा स्टॉल या बांगडीवाल्याच्या अगदी दोन स्टॉल लागून पुढे होता... मुलासाठी तीन मिनिटात एक स्लीपर घेतलं. स्लीपर ही एक सोय होती...त्यामुळे फार घासाघीस....चॉइस हा भागच नव्हता. फक्त त्याच्या पायाला बसणारं आणि कम्फर्टेबल होईल अशा स्लीपरची खरेदी अवघ्या तीन मिनिटात ...

रंकाळ्यावरील पाऊसवाट

Image
रंकाळ्यावरील पाऊसवाट .... @अनुराधा कदम, कोल्हापूर टपोरे दुधाळ ढग जणू रंकाळ्याच्या पाणीदार ओंजळीत आलेले...जिथे नजर संपेल तिथे अंधारून आलेला आसंमत...तलावातील तरंगांवरून येणारी थंडगार झुळूक थेट मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी आणि अशा वातावरणात रंकाळ्याच्या दगडीकाठांनाही फुटलेला ओलेता पाझर...पावसाच्या रिमझिम सरी झेलत रंकाळ्याची ही सफर केवळ अविस्मरणीय. तलावातील प्रवाहात पावसाच्या थेंबांनी तयार होणारी नक्षी पाहत काठावरून एकेक पाऊल पुढे टाकताना पाऊसमय रंकाळ्याची अनुभूती मनाला ओलेचिंब करून जाते. ताराबाई रोड संपला आणि रंकाळा चौपाटीकडे जाणारी पहिली पायरी चढून शेवटच्या पायरीवर आलं की समोरच्या विशाल प्रवाहातून येणारी वाऱ्याची झुळूक अंगांवर झेलायचा अवकाश की पश्चिमेचा तो शहारा रोमांचकारीच. इथला रिमझिम पाऊसही वाऱ्यामुळे झोंबणारा वाटला तरी त्याचं ते झोंबणं तितकंच लाघवी. दगडी काठावर मायेचा हात फिरवत पुढे जावं आणि दगडावर पहुडलेल्या थेंबांनी हात ओले करता करता मनही ओले व्हावे... हा अनुभव तर भन्नाटच. पायात साठलेल्या पाण्याला छेडताना आपल्यातील अवखळपणा पावसाच्या साथीने जरा जास्तच बहरतो. रंकाळ्याभोवतीच्या ...

कृष्णकिनारा

Image
निमित्त.... कृष्णकिनारा आज अरूणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा कथासंग्रहातील राधा या कथेचे अभिवाचन ऐकण्याची पर्वणी मिळाली. कथा वाचणं आणि ऐकणं यात नक्कीच श्रवणीयतेचा अनुभव मनाच्या अधिक जवळ नेणारा आहे. राधा आणि कृष्णाची सागरकिनारी होणारी भेट व त्यांच्या संवादातून आयुष्यातील काही भावबंधाच्या गाठी अलगद सोडणारे शब्द. राधेचे कृष्णार्पण आजही अपुऱ्या प्रेमासाठीच उदाहरण म्हणून दिलं जातं. तिच्या ओंजळीत प्रेमाच्या काही क्षणांची पुरचुंडी देऊन कृष्ण निघून गेला...तेच मोहोळ तिने जपलं. कित्येक वर्षांनी पुन्हा भेटीचा क्षण आला तेव्हा राधेने कृष्णप्रीतीच्या आठवांची ती पुरचुंडी उघडली खरी...पण कृष्णाने तिच्या प्रत्येक हळव्या प्रश्नाला कठोर उत्तराची झालर लावली. प्रेम जहरी असतं...कडू असतं खूप...न मिळालेलं प्रेम तर खूपच वेदनादायी...राधेने ते तिच्यात भिनवलं. माझं तुझ्या अपुरेपणाशीच नातं होतं असं म्हणणाऱ्या राधेला जेव्हा कृष्ण म्हणतो की प्रत्येकाचं स्वतंत्र जगणं अटळ आहे, तेव्हा तिने त्याच्या वाटेकडे लावलेल्या डोळ्यात टचकन पाणी येतं. तिच्यासाठी तो समुद्र व्हावा असं तिला वाटत असतं...लाटेसारखा येऊन प्रवाहाच्या...

माझं सावलीचं झाड

Image
माझं सावलीचं झाड  माझं सावलीचं झाड होता तुम्ही....माझं लग्न ठरलं आणि तुम्ही  मला म्हणालात...कधी तू इतकी मोठी झाली मला कळलच नाही बाळा... त्यादिवशी माझ्यातील अवखळपणाला पहिला धक्का लागला....मी मोठी झाले असं वाटण्यासाठी माझं लग्न ठरणं हे कारण ठरावं आणि ते तुम्ही बोलून दाखवावं...हे काही केल्या स्वीकारायला मन तयारच होईना. लग्नाच्या दिवशीही संध्याकाळी सगळं आटपल्यावर तुम्ही माझ्या जवळ आलात आणि म्हणालात....झालं ना सगळं तुझ्या मनासारखं....तेव्हाही माझं मन इतकं जपण्यापलीकडे तुम्हाला काही माहितीच नसल्याची नेहमीचीच प्रचिती मला आली. त्यादिवशी तुमच्या मिठीत मनसोक्त रडताना....तुमचा हात सोडून जाताना...सारखे सारखे मागे वळून पाहताना...तुमच्यातील ठाम माणूसही किती हळवं आहे हे जाणवलं.  तुमच्या लेखी मी आता मोठी झाले होते असं असलं तरी मला मोठं व्हायचच नव्हतं. सरनाईकची कदम झाल्यानंतरही माझा तुमच्याजवळ हट्ट करण्याचा स्वभाव काही बदलला नाही. मला हे हवय...मला ते हवय, आत्ता द्या...गणपतीच्या सणात गौरीसाठी साडी आणायला गेल्यानंतर मला आवडलेली साडी हट्टाने मागून घेण्यात कुठेच खंड पडला नाही. ...

ती आणि तिचं स्वातंत्र्य

मनातले....ओठावर.. @अनुराधा कदम...कोल्हापूर ती आणि तिचं स्वातंत्र्य  ______ आजच्या महिला खूपच स्वावलंबी झाल्या आहेत ...त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आहे.. निर्णय स्वातंत्र्य आहे ...पण  बिटवीन द लाइन्स खूप काही आहे बोलण्यासारखं... ते आत्ता लिहिणार आहे. आजच्या महिला बाइक चालवतात... बाइक त्यांना स्वावलंबनाचे आणि आत्मविश्वासाचे बळ देते. याच वनलाइनवर माझा एका  महिलेशी संवाद घडून आला. आणि सरतेशेवटी 'आज महिला स्वावलंबी आहे ' या विधानापासून 'तिला तिचं म्हणणं मांडण्याचे स्वातंत्र्य तरी आहे का'? या प्रश्नापर्यंत माझं विचारचक्र येऊन थांबलं.... ताई, तुम्ही किती वर्षापासून बाइक चालवता?  माझा पहिला प्रश्न. पंधरा वर्षापासून बाइक चालवते माझी बायको...उत्तर मात्र नवऱ्याने दिले. बाइकमुळे तुमचं दैनंदिन आयुष्य किती सोप्पं झालय असं वाटतं? अहो, किती वेळ वाचतो तिचा...शिवाय मुलांना ने आण, बाजारहाट, बिलं भरणं हे तिचं तीच करते...यावेळीही उत्तरासाठी नवरोबाचा आवाज.. पुढचे प्रश्न तिला आणि उत्तर मात्र त्याच्याकडून... बाइक निमित्ताने असलेल्या स्पर्धांमध्ये तिने खूप बक्षीसं मिळवलीयेत......