क्यू की बोलना जरुरी है बॉस...
क्यू की बोलना जरुरी है बॉस...
ओ मॅडम, इथे गाडी लावू नका... का नको लावू...? पार्किंग पट्ट्याच्या आत आहे ना माझी गाडी? माझा प्रतिप्रश्न
दिसत नाहीय का....मी बांगड्यांचा स्टॉल लावलाय...
कष्टमरला त्रास होतो स्टॉलपर्यंत यायला...
बर मग...?माझा आपला नवा प्रश्न...
आणि तुझं दुकान तर ते समोर आहे...मग हा कॉट का मांडलायस रस्त्यावर? मी खोलात शिरले.
आणि एक...रस्त्यावर, पार्किंगच्या जागेत गाडी लावायची नाही हे तू कोण सांगणार मला...माझा पारा चढला...
तरी गाडी काढा इथून... आता कष्टमरचा टाइम आहे...
गर्दी होईल स्टॉलवर....धंद्याचा वांदा करू नका नाहीतर तुम्ही येईपर्यंत गाडीतली हवा सोडेन....
त्याचा पीळ काही जात नव्हता....मी त्याच्याकडे बघतच गाडी लावली....
मुलाच्या पायाच्या घोट्याला जखम झाल्याने त्याला काही दिवस सँडल, बूट घालणं शक्य नव्हतं. चप्पलचा स्टॉल या बांगडीवाल्याच्या अगदी दोन स्टॉल लागून पुढे होता... मुलासाठी तीन मिनिटात एक स्लीपर घेतलं. स्लीपर ही एक सोय होती...त्यामुळे फार घासाघीस....चॉइस हा भागच नव्हता. फक्त त्याच्या पायाला बसणारं आणि कम्फर्टेबल होईल अशा स्लीपरची खरेदी अवघ्या तीन मिनिटात झाली.
मी गाडीजवळ आले...पुन्हा त्या बांगडी वाल्याच्या डोळ्यात पाहिलं.
काय रे...किती कष्टमर आले तुझ्या स्टॉलवर तीन मिनिटात....?
उत्तर नव्हतच...शिवाय आवाजही आता खाली होता.
मुळात दुकानातील पसारा रस्त्यावर मांडून अतिक्रमण करायचं....हप्ता खाणाऱ्या पोलिसांच्या जीवावर रस्ता व्यापायचा.... आणि नियमात वागणाऱ्या लोकांना धंद्याचं गणित सांगून रोब झाडायचा...
...ही मस्ती उतरवणारी यंत्रणाच जीवंत नसेल तर हे होणारच.
Comments