काकुबाई दिसत असून सुद्धा म्हणजे नेमके काय...

परवा एक पोस्ट आली फेसबुकवर...त्याची सुरूवातच अशी होती की...दिसायला काकुबाई दिसल्या तरी ही महिला एका चांगल्या पदावर कार्यरत आहे. ज्यांनी हे शब्द रचले त्यांचा दृष्टिकोन खटकला. मुळात कशीही गुंडाळलेली साडी...केसांचा अंबाडा किंवा मुरकुटं करून मानेच्यावर पिनमध्ये कोंबलेले केस...खोचलेला पदर अशा रूपातली महिला समोर आली की तिला अनेकदा काकुबाई हे विशेषण अगदी सहजपणे लावले जाते. फार कशाला कधी कधी आपल्याला काहीही न आवरता अजागळ रहावेसे वाटते तेव्हा जर तीच महिला अगं आज माझी पार काकूबाई झालीय अशी उपाधी स्वताच लावून घेते...सांगायचा मुद्दा हा की कुणी केली ही व्याख्या. आणि मग नेहमीच अशा रूपात असलेल्या महिलांमध्ये काही धमकच नसते असा अर्थ घ्यायचा का... दिसायला काकूबाई असूनसुद्धा या महिलेने खूप मोठ्या पदावर काम केलेय असा तुलनात्मक अर्थ काढणाऱ्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेबाबत आणि त्याच्या दिसण्या व असण्याबाबत बोलूच नये.

Comments

Unknown said…
दिसण्यापेक्षा स्वत:च्या असण्याला महत्व द्यायला हवं.
Unknown said…
दिसण्यापेक्षा स्वत:च्या असण्याला महत्व द्यायला हवं अशी मानसिकताच नसते लाोकांची. अनू, मलाही असा अनुभव आला हाोता. विशेष म्हणजे महिला सहकार्ऱ्यांकडून की तू खूप काकूबाई वाटतेस... मी म्हटलं की, मी कधीच दिसण्याला महत्व देत नाही...माझ्या असण्याला महत्व देते. मी माझं काम, माझी कर्तव्ये नीट पार पाडत असेल तर दिसण्यात काय आहे?

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...