लगेच पुढचा कार्यक्रम
साहित्य संमेलन...शास्त्रीय गाण्याची मैफल...एखादी प्रकट मुलाखत, सखोल
विवेचनावर आधारित परिसंवाद...अशा कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून
येणाऱ्या राजकीय नेत्यांना नेहमी लगेच पुढचा कार्यक्रम कसा काय असतो हे मला
अजूनही कळलेले नाही. संयोजकांनी दोन महिने आधी नेत्यांची वेळ घेतली तरी
प्रत्यक्ष कार्यक्रमादिवशी शुभेच्छांची साच्यातले भाषण करून लगेच माफी
वगैरे मागून नेतेमंडळी निरोप घेतात. पण पक्षाचे प्रमुख, अध्यक्ष यांच्या
सभा अगदी आयत्यावेळी ठरल्या तरी यांच्याकडे चारेक तासांचा वेळ अगदी सहज
असतो. कोल्हापुरातील मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादिवशी सहकार
मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर
आणि समारोपादिवशी माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनाही असा लगेच पुढचा
कार्यक्रम होता. एखाद्या परिसंवादासाठी तासभरही त्यांनी देऊ नये का?
Comments