पत्रकारितेने मला काय दिले...?
पत्रकारितेने
मला काय दिले...?
कधी शब्दाला
शस्त्र बनवून विघातक गोष्टींवर प्रहार करायचा तर कधी त्याच शब्दाचे मोरपीस बनवून समाजातील
विधायकतेचे कौतुक करायचे हा पत्रकार म्हणून माझा धर्म. गेली १६ वर्ष मी तो
मनापासून जपते आहे आणि जगते आहे. शब्दाच्या अनेक छटा हाताळत हा प्रवास नक्कीच
अंतर्मुख करणारा आहे. आजच्या पत्रकार दिनाच्या औचित्याने, पत्रकारितेने मला काय
दिले? असा विचार करते तेव्हा खूप अभिमान वाटतो. माझ्या लेखणीने मला माणूस म्हणून
घडवले. विचारांना धार दिली आणि निर्णयक्षमतेचा पाया दृढ केला. धैर्य, आत्मविश्वास
आणि स्वाभिनानाची त्रिसूत्री माझ्या अंगी भिनवली. रोज नवा दिवस नव्या अनुभवासोबत जगण्याची संधीही
या पत्रकारितेनेच दिली. माणसं कमावून कधीही न संपणारी श्रीमंती मला दिली...माझ्या
खारीच्या वाट्याने समाजाला घडवणारी माझ्या हातातील लेखणी मलाही घडतवेय आणि घडवत
राहील...
Comments