आजकाल त्याची कारणं ऐकायला नको वाटते
भेटतो भेटतो म्हणतो पण त्याच्या सबबींचीच माळ लागते

कधी कधी वाटतं, त्याच्यापेक्षा या पावसावरच प्रेम करावंं
नखशिखान्त भिजवून टाकणाऱ्या त्या पावसासाठीच जगावं

त्याला भेटायला जाताना खरंतर या पावसानच खूपदा नडवलंय
पण त्याला भेटून निघताना या पावसानेच तर माझं पाऊल अडवलंय

तो किती माझ्यात आहे हे पावसाइतकं कोण जाणेल?
माझ्यापासून दुरावलेल्या त्याला...हा पाऊस पुन्हा माझ्यापाशी आणेल?

Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...