भरलं वांगं @अनुराधा कदम आपल्या आहारामध्ये वांग्याची बातच न्यारी. मुठीत मावणाऱ्या आकाराची फिकट हिरव्या रंगाची किंवा आमसुली रंगाची शिरेदार वांगी सुरगणीच्या नजरेला पडली रे पडली की तिला वांग्यांच्या खाचांमध्ये भरलेला मसाला, ती तेलात टाकलेली कांद्याची फोडणी, तेलात कांदा परतेल तसे सुटणाऱ्या तेलातून चमकणारा कट दिसायला लागतो. आधी जर कढईत चमचाभर तेलात परतून तपकिरी झालेली वांगी असतील तर मग खाताना त्याचा लुसलुशीपणा जिभेंवर रेंगाळतो. तर आपण होतो बाजारात... भाजी खरेदीला गेलेल्या सुगरणीला गावाकडच्या भाजीवालीकडे मनासारखी वांगी दिसली की ती अर्धी लढाई इथेच जिंकते. हाऱ्यात नेटाने मांडणी केलेल्या वांग्यांच्या ताफ्यातून एकेक वागं भाजीवालीने दिलेल्या बुट्टीत काढताना तिने मध्येच हात घातला तर असा काही एक कटाक्ष टाकला जातो की बोलायची सोयच नाही.. त्या बघण्याचा अर्थ असा असतो की, मावशी, तुम्ही नका वांगी निवडू,,,मला भरली वांगी करायची आहेत त्यामुळे मी त्या मापाचीच घेणार. त्यामुळे एखादं मोठं, जून वांग खपवायच्या बेतात असलेली ती इरसाल भाजीवाली पट्टीच्या सुगरणीसमोर पामर होते हो. चांगली किलोभर वांगी पिशवीत स्वा...
Comments