काहीवेळानं विरून जाणारं धुकं...की भरून राहणारं आभाळ...? काय हवंय मला...? परवा धुक्यानं लपेटलेल्या पहाटेनं जागं केलं आणि धुक्यात हरवलेल्या वाटा पाहताना या विचाराने मनावरचं गुलाबी धुकं काहीसं हललं.. सूर्य येण्याआधी धुक्यानं आपल्या गावी परतावं हा निसर्गाचा नियम...निर्विवाद मान्य. म्हणजे धुक्याचं असणं हे त्यांच्या मर्जीचं नाही असंच ना... आपलंही असं होतं का कधी कधी...? आपण कुणापाशी कितीवेळ रेंगाळावं...तिथे पावलं अडखळावीत आपली...हे आपल्या मर्जीचं नसतं. कुणीतरी येण्यापर्यंतचा रिकामा वेळ धुक्यासारखं आपण तिथं सोबत करावी आणि मग विरून जावं तिथून.. असंही असतं. धुक्याचं असणं किती रोमांचकारी असतं ना...धुक्यात समारेचं काही...काहीच.. दिसत नाही. धुक्याप्रमाणेच स्वत:ला हरवायला भाग पाडणारी एखाद्याची सोबत असतानाही आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही ना...अगदी तस्सं...तरीही ते क्षण धुक्यासारखे विरून जातात काहीवेळानं... धुकं विरलं तरी टिपूर दवबिंदूच्या खुणा पानावर रहाव्यात तशी धुक्याची रेशमी अनुभूती उरतेच...तिची जाणीव धुक्यातील त्या धुंदीसारखीच... पावसाचा सांगावा देणारं काळंभोर आभाळपण असंच हवंहवंसं वाटतं...क...
Posts
Showing posts from 2019